बाया
सकाळी सकाळी जोरजोरात कानडीत बोलल्याचा आवाज येत होता , पाठोपाठ
पोरांच्या रडण्याचा . तसा तो आवाज नेहमीचाच आहे पण आज अजून जरा वेगळा कारण लक्ष्मीची
पोरं आज रडत नव्हती तर तीच मोठमोठ्याने हंभरडा फोडून रडत होती पण कानाने ऐकण्यापेक्षा
काहीच करू शकत नव्हते . तिला मारलेले फटक्यांचे सुद्धा आवाज ऐकू येत होते . प्रत्येक
फटक्या सरशी अंगावर काटा येत होता , तिला किती लागले असेल ? प्रत्येक फटक्याने तिच्या
मुलांचाही आवाज वाढायचा . हा आवाज सकाळी सकाळी येतोय म्हणजे लक्ष्मीचा नवरा दारू पिला
नव्हता हे नक्कीच .
ऑफिसला जाताना लक्ष्मीचे डोळे सुजून टम्म झालेले पहिले .
"सकाळी काय झाले ग ? " एवढेच विचारले तर तिचे उत्तर -
काय करू म्याडम , चार दिवस मला खूप ताप आलाय , काम होईना म्हणून
ह्याला म्हणाले मला दवाखान्यात घेवून जा म्हणून एव्हढे मारत होता . पण मी आज गावाकडं
जाणार आहे , पोराला बी शाळेत नाही लावले .
संपली कहाणी ? ताप संपला का नवीन परवड सुरु ?
काल लक्ष्मी सांगितल्याप्रमाणे गावाकडे निघून गेली . रात्री पर्किंगमधल्या लाईट लागल्या
नव्हत्या , जिन्यात पूर्ण अंधार होता . सकाळी पहाटे उठून तिचा खराटा वाजत नव्हता .
सकाळी सव्वासाथला तिचे पार्किंग झाडून पुसून झालेले असते , पण आज तिचा नवरा साडेसाथ
झाले तरी उठला नव्हता . मग कधी उठला काय माहित ? म्हणजे आजची तिची सर्व कामे त्याला
करावी लागणार हे नक्कीच काल तिला मारून तिला जेवढा त्रास दिला त्याच्या कितीतरी पटीने
ह्याला आज काम करावे लागणार ….
पण तो शांत निवांत, कारण एकच असावे - जावून जावून जाणार कोठे
येयील चार दिवसाने परत हा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
No comments:
Post a Comment