बायकांच्या डोक्यात केमिकल लोचा नक्कीच असावा , खूप दिवस मनातच
ठेवले पण आज सांगावेसेच वाटतेय. खुपदा मुलींचे असे असते की एखाद्या मुलावर प्रेम जडते , मुलगी मनापासून
करते , हळूहळू मुलगा तिला सांगायला लागतो - मला तू आवडतेस पण माझ्या घरच्यांना नाही
पटणार . मग कोणीच सुखी होणार नसेल तर लग्न कशाला करायचे ? त्यापेक्षा आपण हे तुझ्या
किंवा माझ्या (कोणाचे आदी होईल तोपर्यंत) लग्नापर्यंत
चालवत राहू , एकमेकांचे होवून राहू ,(तोपर्यंत मिळणारे फायदे मला मिळूदेत ) असे काहीतरी
सांगून मुलींना झुलवत राहतात . मुलीही खुपदा अशी रिलेशन्स चालूच ठेवतात . मनाला समजावत
नाहीत -- हे तात्पुरते आहे , तकलादू आहे किंवा
असे सर्व सांगणारी सिस्टीम आपल्याकडे नाहीच . हे मी सांगतीय कारण मी अशी बरीच उदाहरणे
आजूबाजूला पाहते . मुलींचे मन मानायला तयारच नसते किंवा ध्यानात पण येत नाही त्यांच्या
- ह्या सर्वात आपण स्वतःचे किती नुकसान करून घेतोय . इतक्या त्या मनाने गुंतलेल्या
असतात . पुढे व्हायचे तेच होते - मुले दुसरीशी
लग्न करून सर्व विसरून जातात , मुलीही दुसऱ्याशी
लग्न करतात पण जुन्या आठवणींना कुरवाळत बसतात .
माझा एक मित्र - एका मुलीबरोबर त्याची तशी… मैत्री . मैत्री का काय ते ठावूक नाही पण … त्या मुलीची तो सर्व काळजी
घेतो , घेवून फिरतो ,एकत्र जेवतो , वाट पाहतो
… अजून बरेच काही असेलही पण लग्न -- नाही करणार
. म्हणजे असेही नाही कि तो दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न करणार नाही तर दुसऱ्या मुलीशी
करणार पण हिच्याशी नाही … का तर म्हणे त्याची
आई फार कट्टर - जातीशी , मग लग्न नाही करू शकणार म्हणे … खुपदा सांगितले अरे आईला मनव
की …. पण नाही - म्हणे ह्या लग्नाने जर कोणीच सुखी होणार नसेल तर कशाला करायचे . अरे
हो पण मग तिला गुंतवून कशाला ठेवायचे ?( आणि तिने तरी का गुंतायचे? ), तिला तिचे आभाळ
शोधू द्यावे ना -- पण नाही … ती माझीच असेल जोपर्यंत माझे किंवा तिचे लग्न होत नाही
तोपर्यंत . तिची त्याच्याशी खूप इच्छा लग्न करण्याची पण त्याच्या घरी चालणार नाही
… मग ही बिचारी प्रेम विसरू शकत नाही हे कारण सांगून स्वतःच्या मनाला फसवत राहिलीय
. हे सर्व पचवण्यासाठी आहेच राधा कृष्णाचे उदाहरण . कृष्णाबरोबर म्हणे राधेचेच नाव
घेतले जाते , रुक्मिणीचे नाहीच … अरे पण राधेचे
लक्षात ठेवले तुझे नाही हे कोण समजावणार ?
आपल्याकडे मुलींनी हे
सर्व पटवून देण्याची सिस्टीम नाही …मग दुःख करत बसायचे किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये
जायचे , अभ्यास करिअर बंद . मुली खूप अभ्यास करतात चांगले मार्क्स पाडतात पण प्रेमवीराची
लायकी नाही चांगले मार्क्स मिळत नाहीत मग ह्या त्याचे सर्व जर्नल्स , नोट्स साठी मदत
करणार तोपर्यंत हे वीर सतत सोशल मिडीयावर पडीक (दुसऱ्या पोरींबरोबर गुलुगुलु गप्पा
मारत )आणि ह्या राबणार … स्वताची उन्नती रोखून,
नेहमीच पडती बाजू मुलींची हेच जणू पटवून दिलेले असते त्यामुळे मुलीना बायकांना सवयच
असते नमते घ्यायची .
आजकाल बायका -- ज्यांना घरात प्रेमाचे दोन चार शब्द मिळत नसतात
त्याही अशा प्रेमविरासाठी वेड्या असतात , समोरचा पुरुष - मी तिला आधार देतोय ह्या गोंडस
नावाखाली तिच्याकडून सर्व फायदे वसूल करत असतो
आणि ह्या बायका तो आपल्यावर किती प्रेम करतोय म्हणून …उतावळ्या असतात . जे बोलू
नये ते बोलत असतात … मागे हा वीर तिचे सर्व
आंबट गोड मेसेज आपल्या मित्रांना फोरवर्ड करत असतो . बाईला ह्याचा पत्त्याच नसतो आणि
वर सांगत असतो … बाईला अक्कल नको हे सर्व करताना
…? तिला पण ह्यात आनंद मिळतोय … मी तो तिला
देतोय… अरे हो पण चार चौघांना सांगून तो माणूस तिची चार माणसात इज्जत घालवतोय
त्याचे काय ?
ह्या बायका मुली आडाणी नाहीतच - तर चांगल्या शिकल्या सावरलेल्या
, कमावत्या असले काहीच बिरुद चिटकवून त्यांना
वेगळे करता येत नाही -- म्हणजे काहीतरी केमिकल लोचा आहे . कसा सावरावा तो? ? सावध ह्या पुढच्या हाका ऐकायला मदत करेल
का ?
No comments:
Post a Comment