Tuesday, March 3, 2015

द्विधा

        कितीही नाही म्हणले तरी प्रत्येकाला या अवस्थेला समोरे जावे लागतेच . अगदी लहान असताना सुद्धा खुप साऱ्या खेळण्यातून कोणते निवडू ?कोणते जास्त रंगीबेरंगी आहे .ह्यावरून लहान मुल आपली निवड करते .तिथून जरा पुढे आले कि..शाळेच्या उंबरठयावर --ती असतेच खेळू कि अभ्यास करू . मोठे सर्व सांगत असतात -अभ्यास कर पण मन नेहमी खेळालाच पसंदी देते .त्यासाठी एवढा विचार करावा नाही लागत .जसजसे मोठे होवू तशी हि अवस्था वाढतच जाते नी मग निवड करणे अवघड होवून बसते .दहावीनंतर हे अधिकच अवघड होवून जाते..किती जणांनी आपल्याला आवडणाऱ्याच  शाखेला प्रवेश घेतला असेल ,कितीही मनात द्विधा असेल तरीही पडणारे मार्क्स आणि पालक ह्यांच्या ज्या इच्छा असतील त्यालाच प्रवेश घेतलेला असतो मग त्यात कितीही कोंडमारा झाला तरी ..आपल्याकडे कला शाखेत जाण्यासाठी त्याचे/तिचे कलेतले कौशल्य नाही पहिले जात .अशी हि द्विधा आयुष्यभर  पिच्छा पुरवते .कारण ध्येय एक नसते .काय करायचे हे पक्के मनात ठरवलेले नसते .नेहमीच दोन दगडावर पाय ठेवण्याची सवय लागते आणि मग किती चुकीचे निर्णय घेतले जातात कोणास ठावूक.आहेच मग पश्चाताप . मला  हेच करायचे आहे आणि त्याच्या भल्या बुऱ्या परिणामासाठी मी जबाबदार असेन ..हेच शिकवले जात नाही . मग हे करून पाहू ,ते करून पाहू आणि मन कशातच नाही . बायकांसाठी खूप वेळा ह्या अवस्थेला सामोरे जावे लागते ..सुरवात होते "भाजी काय करू?" ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही .. बायकांसाठी हा भाजीचा प्रश्न म्हणजे एकदम गहन प्रश्न आहे.
         तरुणांना साठी तर --बापरे किती आणि कितीवेळा वागवतात ते हि अवस्था , कशी आणि कोणत्या गोष्टी वर निवड ठरवत असतील कोणास ठावूक-करिअर ,लग्न आणि बऱ्याच गोष्टी ... ?
        मुलीना तर हि अवस्था फक्त मनातच -बोलण्याचे धाडसच नसते मग होणारा कोंडमारा वागवायचा आयुष्यभर . का नाही घेतले जात निर्णय हि "द्विधा "टाळून ? घेतलेल्या निर्णयाने चांगले झाले तर ठीक नाहीतर आहेच ...असे केले असते तर याची बोच .
      "एकाच निर्णयावर ठाम राहून भल्या बुऱ्या परिणामासाठी तयार राहावे " हे लहानपणापासूनच शिकवायला हवे नाही का ? त्यातून अपयश आलेच तर नवीन मार्ग शोधण्याचे धाडस हि मिळेल  आणि द्विदेला पूर्णविराम मिळेल .




No comments:

Post a Comment