सुट्टया पडल्या कि आजकाल मुलांना किती प्रश्न पडतो ,कोठे जायचे
? कसे काढायचे एवढे दिवस ? रोज रोज तेच तेच काय'बोर प्रोग्राम पाहणार ? कोणच्या परीक्षा
-- नवीन ट्युशन , खेळायला मुली पण नाहीत . कोठे करायचे सायकलिंग ? हे भरधाव धावणाऱ्या
गाड्या . मुख्य म्हणजे खेळण्यासाठी मित्र -मैत्रिणी नाहीत आणि दुसरे म्हणजे खेळायला
जागा हि नाही . मला पूर्वीचे दिवस आठवले . आज शाळेला सुट्टी मिळाली कि उद्या मामाच्या
गावी जायचे . आजोबा न्यायला येत असत . मग दोन-तीन
फ्रोक वायरच्या पिशवीत भरायचे आणि सकाळी सकाळी निघायचे . आई चपाती -पिठलं करून द्यायची
. गावात पोहोचतो न पोहोचतो तोच आजोबा म्हशी घेवून पाण्यावर जायचे नदीला . मग लगेच त्यांच्याबरोबर
नदीवर . नदीत मनसोक्त खेळायचे ,डुंबायाचे . घरी परतून गेले कि आजीने मस्त स्वयंपाक
केलेला असायचा . त्यावर ताव मारून रात्री स्लापवर झोपायला जायचे .तिथे चांदण्या मोजत
,रामचा पाळणा आणि काय काय शोधायचे आकाशात . आईची आठवण काढत ,तुटते तारे पाहत झोपून
जायचे .
सकाळी चहा-बटर खावून पुन्हा नदीवर . घरी येयीपर्यंत आजीने ताक -सांडगा भाकरी तयार
ठेवलेली असे . खावून मग मोर्च्या वळायचा तो सर्वांच्या घरात . प्रत्येकाच्या घरात मायेचा
हात डोक्यावरून फिरत असे . "कवा आलीस ?कशी हायीस बाळे , शेशा बरी हाय नव्हं
" असे विचारले जाई . मग सर्व पाहुणे मंडळी
म्हणजे बच्चे कंपनीचा मोर्चा मोठ्या महादेवाच्या मंदिरात . तिथे मग काय काय
खेळायचो बापरे . पुन्हा बारापर्यंत जेवायला घरी . जेवून मग पत्त्यांचा डाव .त्यात मेंडीकोट
,गुलाम ,पाच तीन दोन , साथ -आठ खेळत असू . काय काय छक्के -पंजे तिथे लडवत असू बापरे
. दुपारी करवंद ,जांबळ विकणाऱ्या बायका यायच्या . त्यांच्याकडून मग आजी भातावर किवा
मक्यावर घेत असे . प्रत्येकाचे वाटे आजी काढून देई . करवंदातले मग कोबडा -कोबडी शोधायचे
. मग चार वाजता आजी आंब्याचा हारा घेवून बसे
. प्रत्येकाला ऐक ऐक आंबा आजी वाटून देई . एक खावून पुन्हा दुसरा मागायचा. आजी देई
. कधी कधी रागे हि भरत असे .
रोज काहीतरी नवीन
पदार्थ . अमृतफळ ,मेतुंडा आणि काय काय . आठवड्यातून दोनदा मटन ,रक्ती ,मुंडी (बकर्याची
), मासे ,खेकडे . खूप चव होती आजीच्या हाताला . दुध दुपतेहि कमी नसायचे .तुप तर आजी
पुरे म्हनोपर्यंत वाढायची . कधितरि शेतात म्हजे "आंबील काट्यात"(शेताचे नाव
) जाण्याचा प्रोग्राम . पाटीतन आजी सर्व जेवण
बांधून घेई . पाटी आणि आम्ही tractor मध्ये चढवले जावू . म्हजे ट्रॉलीत . मग मस्त दणके
खात खडाम खडाम आवाज करत शेतात .तिथेहि नदी . वांब पकडण्यासाठी आजोबांनी निगडीचे झुपके
नदीत झुडपात अडकवलेले असत. मग शेतात पोहचल्यावर त्या वाम्बा पकडण्याची प्राक्टीस .
नदीत पोहत नदी पार करण्यची स्पर्धा . उन्ह
लागायला लागले कि केळीची पाने काढली जायची . भात आणि दही ,भाकरी ,चटणी ,भाजी -उसळ
. भात आणि दह्यात आजी नदीचे थोडे पाणी आणून कालवी मग तो सरबरीत होई . केळीच्या पानावर
खाताना मजाच येई . खावून मग पुन्हा नदीत . संध्याकाळी पुन्हा उसाची पाचट काढलेलं भारे
, माक्यचा भारा असे सर्व ट्रक्टर मध्ये भरले जाई . त्या भाऱ्यांवर बसून पुन्हा घरी
. आता थोडे दणके कमी बसत .
भल्या मोठ्या
गणपतीचे मंदिर , बापू मामाच्या दुकानातल्या फुकण्या (बॉबी ), पारावरचा मारुती . विठ्ठल
रखुमाई च्या मंदिरातली भजने . महादेवाच्या मंदिरातला भला मोठा नंदी,त्याची गहूभर पुढे
सरकण्याची कथा . १०८ पिंडी, मंदिरात चढून नाण्यासाठी असणऱ्या दहा पायऱ्या . संपूर्ण
दगडी मंदिर ,आणि खूप साऱ्या दगडांच्या मुर्त्या. उंचच उंच गोपूर . हेमाडपंथी मंदिर
आहे बहुदा . कधीच विसरणार नाही हे मी .
कधी मह्याची टेकडी
. तिथला भैरोबाचे दर्शन. मग मामाच्या मुलींकडून -इथे ह्याचे शुटींग झाले , त्याचे झाले
ह्याचे किस्से . मजा मजा नुसती . कोल्हापुरी भाग आणि नुसता ऊस त्यामुळे हिरवेगार दिसे
सर्व अगदी उन्हाळ्यातही . हळूहळू भाषा उतरायची गळ्यात आणि मग आपोआपच हेल काढला जाई
. "काय करतासा ssss ,बर हायचा नव्ह sss " . कधीतरी कोल्हापूरची अंबाबाई
,ज्योतिबा करून यायचे . सर्वात मुख्य म्हणजे
लग्न सराई असल्यामुळे पाह्यला मिळणाऱ्या वराती . लेझीम चे खेळ . अहाहा अप्रतिम . स्वताला
नाचायचा मोह व्हायचा पण मुलीना नाचायची पूर्ण बंदी . शेवटी सुट्टी संपत येत असे . अण्णा
सोसायटीतून मोठा तागा आणायचे गुरवाच्या आबांकडे फ्रीलचेफ्रोक शिवले जायचे . हळूहळू परतीचे वेद . हळूहळू पावसाला लागे आणि मामाचे
गाव पुराने वेडले जायचे . मग नावेतून कोगे -बालिंगा आणि नंतर कोल्हापूर असे परतीचा
प्रवास . जड मनाने परत गावी पुढच्या सुट्टीत येण्याचे आश्वासन देवून . अजून खूप आहे आठवणीच्या
कुपीत. तपशिलाने पुस्तक लिहून होईल . पण कोल्हापूर भागातली माणसे जरी "टगे
"म्हणत असलो तरी तशी नाहीत . माया मामाताही खूप आहे त्यांच्याकडे .
No comments:
Post a Comment