जन्म आणि मृत्यू ह्या माणसाच्या आयुष्यातील दोन अटळ घटना , ह्या दोन घटनांशिवाय माणसाचे हे आयुष्य पूर्णच होत नसते . जन्माने पूर्णतः अस्तित्वात नसलेली व्यक्ती जन्माला येते तर मृत्यूने ती व्यक्ती ह्या जगातून नाहीशी होते . नाहीशी म्हणजे किती तर इतरांनी कितीही टाहो फोडला , कितीही पैसे मोजले तरी तो माणूस परत आपल्याला दिसू शकत नाही . फक्त आणि फक्त आठवणीच जागवता येतात . विज्ञान कितीही पुढे गेले तरी ह्यावर काहीही उपाय नाही . पण माणूस अक्षरशा गुलाम झालाय ह्या नोकरी धंद्याचा . कोणाला भेटायला जायचे असते , कोण्या आजारी माणसाला पाहायला जायचे असते पण आपण ते पुढे ढकलत असतो , उद्या जावू , परवा जावू -- अशी हि यादी संपतच नाही आणि अचानक ती व्यक्ती निघून जाते . आपण जाण्याने फार काही फरक पडणार नसतो पण त्या व्यक्तीच्या शेवटच्या काळात त्याला थोडेतरी सुख मिळते , त्याचे /तिचे मन थोडे का होईना फुलपंखी होत असेल . जाण्याचा तो काळ थोडातरी सुखाचा होत असेल पण असे होत नाही . आजचा माणूस परिस्थितीचा , नोकरी धंद्याचा अक्षरश : गुलाम झालाय .
हे आठवण्याचे कारण आज आमच्या शाळेचे रामा जोशी सर गेले , त्यांच्या शेवटच्या काळात ते इथे पुण्यातच होते पण भेटायला जायला जमलेच नाही न त्यांच्या अंत्यविधीला . पण अजूनही त्यांची शाळेत जातानांची छबी डोळ्यासमोर आहे . दहावीचे फार तर दोन चार क्लास त्यांनी आम्हाला शिकवले पण त्यांची ती शिकवतानाची मूर्ती अजूनही डोळ्यासमोर आहे त्यांच्या घरी दत्त मंदिरआहे . तल्लीनतेने दत्ताची पूजा करतानाचा त्यांचा वावर जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे . सकाळच्या काकड आरतीला त्यांनी हातात घेतलेली पंचारती अजूनही तशीच दिसतीय . दत्ताच्या पालखीला सोवळे नेसून उपरणे सावरतानाचा - "दत्ता दिगंबरा यावो , स्वामी मला भेट द्याहो … " हा आवाज अजूनही घुमतोय . लग्नाच्या साखरपुड्याला त्यांनी केलेली कलश पूजा . सासरच्या नवीन मंडळीत घाबरून जावू नये म्हणून ते मला देत असलेला धीर . जसेच्या तसे सर्व आठवतेय . सरांची तीच मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे . त्यांचा मुलगा श्रीकांत माझा क्लासमेट , परवाच भेटलो तेंव्हा सरांच्या बद्दल बोलणे झाले … पण तरीही भेटण्यासाठी वेळ काढतच आला नाही ह्याचे शल्य आहेच . डोळे दान करून एक आदर्श शिराळकरांसाठी त्यांनी घालून दिला . सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे सर गेले म्हणून अक्खा गाव आज हळहळला . त्यांना शेवटी भेटू नाही शकलो म्हणून प्रत्येक शिराळकर मनाने हळहळला . कोठेही घेवून जावू नकोस असे मुलाला सांगून त्यांनी स्वप्रतीमेचे अवडंबर हि माजवले नाही . किती ते आदर्श आणि सचोटीचे वागणे . "मुलांना फुलाने मारावे", असे ते एकदा आज्जीला म्हणाले होते ते वाक्य आठवले … त्यांना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .
दररोज मी आईकडे फोन करून आजोबांची तब्बेत विचारायचे , आई सांगायची तब्बेत बरी आहे अण्णांची पण तू येवून भेटून जा . आठवण काढतात तुझी . हो ग येते - सुट्टी कधी मिळतेय बघते. असे सांगते तोवर मुलीची परीक्षा होवूदे , पुढे प्रोजेक्टचा रिलीज जवळ येतो . तोवर कंपनीची ट्रिप निघते , तोवर अजून कोणता तरी प्रोग्रॅम …. असे होत राहिले आणि अण्णा एक दिवस असेच अचानक निघून गेले . गावी पोह्चोपर्यंत आण्णांचा अंत्यविधी होवूनही गेला होता त्यामुळे मनात एक कायमची हुळहूळ लागून राहिली पण तरीही मला ते आठवतात ते बरे असतानाचे . चालणारे फिरणारे . कधी कधी वाटते बरेच झाले आपण त्यांचे पार्थिव नाही पहिले नाहीतर तोच शेवटचा क्षण आठवत राहिला असता . त्यांना असे अंथरुणात झोपवलेले निर्जीव शरीर आठवले असते पण आता आठवतात ते - झाडाला पाणी घालातानाचे अण्णा . पांढरे शुभ्र धोतर नेसून त्यावर शर्ट घालून बाहेर पडण्यासाठी तयार झालेले अण्णा . चहा पितानाचे अण्णा . कोणाशीतरी बोलतानाचे अण्णा . आताही कोणी टोपीवाला मी मागून पाहिला कि माझ्या नकळत डोळ्यात पाणी तरळते . डोळ्यांच्या कडा ओलावतात . पण अजूनही आपल्या आजूबाजूला ते आहेत असे वाटत राहते .
कितीहि काही केले तरी ह्या माणसांची हानी भरून निघत नसते , कितीही मनावर ओरखडे उठले तरी ह्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात रुंजी घालतात पण तरीही एक दिवस हे जग सोडून जायचे असते , हाच असतो प्रवास म्हणून मी मनाला समजावले …

The best
ReplyDeleteThe best
ReplyDelete