ब , बळीचा
राजन गवस
पॉप्युलर प्रकाशन
ब बळीचा ही कादंबरी नाहीच . हजारो शेतकऱ्यांचे जीवन
, व्यथा , घालमेल , मरणप्राय जगणं ह्याची जिताजागता अनुभव आहे . छोट्या छोट्या गोष्टीसाठी
काय आटापिटा त्याला करावा लागतो तो शेतकरीच जाणे . लहरी हवामान , सावकारी पाश . कमी
कमी होत चाललेली जमीन आणि जगण्याची कसरत ह्यातून
व्यक्त होते . शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात पण सरकारी नोकर त्या कशा श्रीमंत शेतकऱ्यालाच मिळवून देतात आणि निर्लज्ज
कोडगे तो लाभ कसा उठवतात ह्याचे हुबेहूब वर्णन आहे .
कोल्हापूर भागातली
भाषा हे ह्या कादंबरीचे बलस्थान . एक नंबर जमलीय . प्रत्येक वाक्यागणीस "झ" ने चालू होणाऱ्या
शिव्या मात्र ह्यात आल्या नाहीत हे विशेष .
ही एका भांड्याच्या
दुकानदाराने सांगितलेली "कोणेकरी " ह्या त्याच्या मित्राची कथा आहे , कि
तो हरवल्यानंतर त्याची शोधमोहीम आहे का ?, कोणेकऱ्या ने लिहिलेली चित्रपट कथा आहे का ?, तो सांगत असलेली शेतकऱ्यांची
व्यथा आहे का अजून काही ?
असंख्य कथा, उपकथा
, नोंदी , चित्रपट कथा , जोतीरावांना पत्रे असे सर्व काही ह्या कांदबरीत आहे . लेखक
ह्यात आपल्याला गुंतवून ठेवतो . एकाचवेळी हजारो गुंते सोडवायचा हा प्रयत्न आहे . पण
हा गुंता काही सुटत नाही उलट त्यातच आपण अडकून
जातो . त्यातून सुटका नाहीच .
जोतीरावांना पत्रे :
हा ह्यातील अतिशय मार्मिक पत्रे . ह्यात कोणेकरी महात्मा फुल्यांना पत्र लिहित आहे आणि नकळतच तुम्ही
शिक्षणाची दारे बहुजनांना खुली केली त्याचे काय परिणाम झालेत हे सुनावतो आहे . पूर्वी
आणि अजूनसुद्धा बहुजन समाज ब्राम्हण समाजाला आपल्या अधोगतीसाठी जबाबदार धरत आलाय पण
सर्व शिकून सवरून प्रत्येक माणूस कशी फक्त स्वताची प्रगती करत आहे ते सांगत आहे . हा
फायदा उठवून घेण्यात कोणतीच जात मागे नाही .
सरकारी शिपायापासून
ते अधिकाऱ्या मार्फत कसे पैसे खाल्ले जातात आणि त्याचे पाप मार्जन हे अधिकारी कसे करून
घेतात हे वाचून देव पाण्यातच बुडवावे वाटतात .
ह्या पैसे खाणाऱ्या
अधिकाऱ्या त बायकाही कमी नाहीत . त्यासाठी दिलेले उदाहरण "सौदामिनी खुरकुले"
(नावात काही साम्य दिसतंय का हो ?) ह्या तहसीलदार बाईचे उदाहरण एकदम मस्त. आता ह्या
बाई कोणत्या पदावर पोहोचल्या असतील ?
चित्रपट पटकथा : दारूवाला आणि त्याची मैत्रिण मिळून कोणेकरी
कडून एक चित्रपट कथा लिहून घेत आहेत . त्यातला नायक आडव्याप्पा हा शेतकरी , त्याची
बायको तायव्वा , मुले -सुमी आणि केरु , शिवाय जिवबा दानावडे , तात्या पाटील ,आबा नरसाळे
, संतू खवीस आणि अशा असंख्य पात्रांनी भरलेली ही कथा . शेती हि नायिका .कथा फिरते ती
शेतीवर आणि त्यांच्या जगजीवनावर . ती घालमेल पोहचते . स्वतःलाही ह्या पात्रांचा एक
हिस्सा व्हावेसे वाटते . गावाकडे , खेड्यात ज्यांनी आयुष्य काढले त्याला तर ह्यातून
सुटका नाही . चित्रपट आणि खरे जीवन ह्यात हजारो मैलांचे अंतर आहे हेच सिध्द होत राहते
शेतातला बारकावे , शब्द (घात , टपणे , पाणी लावणे , भांगलन असे
बरेच …) , कष्ट , गाव , परस्पर संबंध , नाती , शहरी आणि ग्रामीण अशी नात्यांची विभागणी
,अचानक आलेली दुखणी , सहकारी सोसायट्या …काय
काय सांगू ?
नोंदी :
कोणेकरी आपल्या घरचे
, स्वतःचे नोकरीतले , भांड्याच्या दुकानात बसून जे जे अनुभव जगतोय ते नोंद करून ठेवतोय
. त्या नोंदीतून स्वतः सरकारी अधिकारी असूनही पैसे न खाता राहिल्याने कसा जगत आहे
, नातेवाईक काय अपेक्षा करतात . अशी घालमेल नितांत सुंदर उतरलीय . त्याचे जंगलाविषयी
ची ओढ , धनगरे , त्यांचे ज्ञान असे असंख्य गुंते
आणि त्यांचे पैलू ह्यात आहेत .
पण ह्या सर्व गुंत्याना उत्तरे नाहीतच , फक्त आपण त्यात अडकायचे
. त्यात गुंतून ठेवायला लेखक आपल्याला भाग
पडतो . ही घालमेल जशीच्या तशी उतरते आपल्यात . त्यातून सुटका नाही .
No comments:
Post a Comment